बहाई उपासना मंदिर

वास्तुशिल्प

जरी बाह्य-स्वरुपात दिसणारे मश्रिकुल-अझकार [बहाई उपासना मंदिर] "एक भौतिक रचना आहे, तरीही त्याचा आध्यात्मिक प्रभाव आहे. ते हृदयापासून हृदयापर्यंत ऐक्याचे बंधन घडवते; हे मानवांच्या आत्म्यासाठी एक सामूहिक केंद्र आहे.”

- बहाई पवित्र लिखाण

बहाई धर्माची मंदिरे त्यांच्या वास्तुकला वैभवासाठी प्रसिद्ध आहेत आणि दिल्लीत बांधण्यात आलेले उपासना मंदिर हे या समृद्ध परंपरेप्रमाणेच आहे. मंदिराचे वास्तुशिल्प हाती घेण्यापूर्वी, वास्तुविशारद श्री. फरीबोर्झ साहबा यांनी या भूमीच्या स्थापत्यकलेचा अभ्यास करण्यासाठी भारतात बराच प्रवास केला होता आणि सुंदर मंदिरांच्या रचनेने, तसेच कला आणि धार्मिक चिन्हे पाहून ते प्रभावित झाले होते, ज्यामध्ये कमळ हे एक आहे आणि ज्याने नेहमीच एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या अनुभवाने ते प्रभावित झाले आणि बहाई धर्माची शुद्धता, साधेपणा आणि ताजेपणा या संकल्पना समोर आणण्याच्या प्रयत्नात त्यांनी कमळाच्या रूपात दिल्लीतील मंदिराची संकल्पना केली.

मंदिर अर्ध्या उघड्या कमळाच्या फुलाची प्रचीती देते, तरंगणारे,  त्याच्या पानांनी वेढलेले. मंदिराच्या प्रत्येक घटकाची नऊ वेळा पुनरावृत्ती होते. लंडनचे फ्लिंट आणि नील भागीदारी सल्लागार होते आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचा ईसीसी कन्स्ट्रक्शन ग्रुप हे मंदिर बांधण्यासाठी जबाबदार कंत्राटदार होते. २६.५ एकर जागेवर पसरलेल्या, मंदिर संकुलात मुख्य प्रार्थनागृह आहे; शिवाय सहायक भाग ज्यामध्ये ग्रंथालय, चर्चासत्रांसाठी दालन आणि प्रशासकीय इमारत आहे. आवारातील अलीकडील अधिक वास्तु म्हणजे माहिती केंद्र जे २००३ मध्ये लोकांसाठी खुले झाले, आणि २०१७ मध्ये उद्घाटन करण्यात आलेले शिक्षण केंद्र.

१०,००० चौरस मीटर इतके संगमरवरी दगड ग्रीसमधून उत्खनन करण्यात आले आणि इटलीमध्ये आवश्यक आकार आणि आकारात कापले गेले.  विशेष डिझाइन केलेले स्टेनलेस स्टील ब्रॅकेट आणि अँकर वापरून आतील आणि बाहेरील कवच या संगमरवराने झाकलेले आहेत.

कमळाच्या सभोवताली गोल खांबांचे वक्राकार कठडे, पूल आणि पायऱ्या असलेले पदपथ आहेत, जे कमळाच्या तरंगत्या पानांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ तलावांच्या भोवती आहेत. सौंदर्याचे स्पष्टपणे एक कार्य करण्याव्यतिरिक्त, हे पूल  इमारतीला हवेशीर होण्यास देखील मदत करतात.

कमळास बाहेरून पाहिले तर पाकळ्यांचे तीन संच दिसतात, जे सर्व पातळ काँक्रीटच्या कवचापासून बनलेले आहेत. नऊ पाकळ्यांचा सर्वात बाहेरचा संच, ज्याला ‘प्रवेशद्वार पाकळ्या’ म्हणतात, बाहेरील बाजूला उघडतात आणि बाहेरील कंकणाकृती हॉलभोवती नऊ प्रवेशद्वार तयार करतात. नऊ पाकळ्यांचा पुढील संच, ज्याला ‘बाह्य पाकळ्या’ म्हणतात, आतील बाजूस वळलेल्या आहेत. प्रवेशद्वार आणि बाह्य पाकळ्या एकत्रितपणे बाहेरील हॉल व्यापतात.

नऊ पाकळ्यांचा तिसरा संच, ज्याला ‘आतील पाकळ्या’ म्हणतात, तो अंशतः बंद झालेला दिसतो. पाकळ्या फक्त टोकाला उघडी दिसतात, काहीसे अर्धवट उघडलेल्या कळीसारखे. हा भाग, जो उर्वरित भागापासून ऊंच चढतो तो प्रार्थना सभागृहाची मुख्य रचना बनवतो. वरच्या बाजूला जिथे पाकळ्या वेगळ्या होतात, तिथे नऊ त्रिज्येचे वासे आवश्यक असा बाजूचा आधार देतात. कमळ शीर्षस्थानी उघडे असल्याने, त्रिज्येच्या वाशांच्या पातळीवर काचेचे आणि स्टीलचे छप्पर पावसापासून संरक्षण प्रदान करते आणि प्रार्थना सभागृहामध्ये नैसर्गिक प्रकाशाचा प्रवेश सुलभ करते.

उन्हाळ्यात बाहेरील तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढू शकते, परंतु आतील जागा तुलनेने थंड राहते कारण मुख्यतः वरच्या रचनेच्या सभोवतालच्या नऊ पुलांमुळे, जे मंदिराच्या सौंदर्यात भर घालताना, प्रार्थना सभागृहाच्या आतल्या पायऱ्यांच्या खाली बसवलेल्या विविध नलिकांमधून थंड वाऱ्यास आतमध्ये प्रवेश करू देते. याशिवाय हवा बाहेर टाकणाऱ्या पंख्यांचा संच घुमटात काँक्रीटचे कवच थंड करण्यासाठी आणि मंदिरात उष्णता जाण्यापासून रोखण्यासाठी व्यवस्था करतो, तर पंख्यांचा दुसरा संच प्रार्थना सभागृहामधली हवा थंड तळघरात सोडतो, जिथे ती थंड करून पुन्हा वापरली जाते.

आतल्या घुमटाला पाकळ्यांमधील आतील पटांमधून फिल्टर केलेला प्रकाश प्राप्त होतो जो संपूर्ण हॉलमध्ये पसरतो.

हे प्रार्थनामंदिर आपले आहे अशी भावना जागृत होईल असे वातावरण निर्माण करण्याचा दृष्टीकोन ठेवून, १,३०० व्यक्तींची आसनक्षमता असलेले हे मंदिर सर्व लोकांचे स्वागत करते.

उपासनागृहांची भौतिक रचना लोकांच्या वाढत्या संख्येला उपासनेसाठी आणि त्यांच्या समुदायाची सेवा करण्यासाठी एकत्र येण्यासाठी जागा प्रदान करतात. म्हणूनच, तयार केलेली जागा सर्वांसाठी स्वागतार्ह असणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे, उपासनागृहांच्या आतील उपासनेच्या पद्धतीप्रमाणे भौतिक गरजा सोप्या आहेत: त्याला नऊ प्रवेशद्वारांसह नऊ बाजू असणे आवश्यक आहे, जे सर्वांसाठी खुलेपणाचे संकेत देते. आत, कोणतेही व्यासपीठ किंवा वेद्या नाहीत आणि कोणतीही चित्रे, चिन्हे किंवा पुतळे नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते सुंदर आणि अस्तित्त्वाच्या जगात शक्य तितके परिपूर्ण असावे, जेणेकरुन पवित्रतेचे आकर्षण वाढवण्याचे साधन म्हणून ते कार्य करील.

बहाई प्रार्थनागृहाच्या वास्तुशिल्प आणि बांधकामावरील माहितीपट

बहाई प्रार्थनागृहाचा सचित्र वास्तुशिल्प मार्गदर्शक येथून डाउनलोड करा.

History

१९५३

जागेची खरेदी

1953-Purchase-of-the-land.webp

१९५३

पायाभरणी

1980-Laying-of-the-Foundation-stone-1-01-e1600274203182.webp

१९८०

मंदिराच्या बांधकामाला सुरुवात

1980-Construction-begins.webp

१९८०-१९८६

बांधकामाची प्रगती

1980-1986-Progress-of-the-construction-scaled-1536x1240-1.webp
WhatsApp-Image-2020-09-02-at-10.15.35-AM-new.webp
Lotus_Temple_const_7-new.webp
Lotus_Temple_const_1-new.webp

१९८६

मंदिराचे उद्घाटन

1986-Inauguration-of-the-Temple-e1600274277418.webp

१९८६

सार्वजनिक उपासनेसाठी अर्पण

Image_038-scaled-1.webp

बागा

उपासनागृह आणि त्याच्या अनुषंगिक इमारती सुंदर बागा आणि हिरवळीने वेढलेल्या आहेत. या बागा आणि हिरवळीची देखभाल पूर्णपणे पुनर्वापर केलेल्या पाण्याच्या माध्यमातून केली जाते.

पुलांच्याकाठी प्रदर्शन

वास्तूच्या सभोवती नऊ पूल आहेत. या पुलांमध्ये कारंजे आहेत ज्यांचा मुख्य उद्देश मंदिराचे सौंदर्य वाढवणे आहे. याव्यतिरिक्त, उन्हाळ्याच्या महिन्यांत प्रार्थना सभागृहासाठी नैसर्गिक शीतकरण प्रणाली प्रदान करण्यात हे पूल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांना दुसरे कोणतेही आध्यात्मिक महत्त्व नाही. तळघरात प्रार्थना सभागृहाच्या खाली स्थित एक पुलांच्याकाठी प्रदर्शन आहे जे उपासना मंदिर, बहाई धर्माची तत्त्वे, बहाई समुदायाने एक चांगले जग निर्माण करण्याच्या दिशेने केलेले प्रयत्न आणि सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नवीन  विचारचौकट याविषयी अधिक माहिती दर्शवते. हा परिसर एक हवेशीर जागा आहे जिथे पुलांजवळ थोडा वेळ घालवता येतो.

माहिती केंद्र

माहिती केंद्र मुख्य प्रार्थना सभागृहाच्या मार्गावर मंदिराच्या मैदानावर उपासनागृहाच्या समोर स्थित आहे. हे प्रामुख्याने बहाई उपासना आणि बहाई धर्माबद्दल अधिक माहिती सामायिक करण्यासाठी योजलेले आहे.

ग्रंथालय

मंदिर संकुलाच्या अनुषंगिक जागेमध्ये स्थित असलेल्या ग्रंथालयात १११ भाषांमध्ये २००० हून अधिक विविध शीर्षकांसह बहाई साहित्याचा संग्रह आहे. यात बहाउल्लाह, दिव्यात्मा बाब, अब्दुल-बहा, शोघी एफेंदी आणि विश्व न्याय मंदिर यांच्या निवडक लिखाणांचाही समावेश आहे. अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यागतांसाठी हे ग्रंथालय अभ्यासासाठी एक अनुकूल वातावरण पुरवते.

उपासनागृहात राबविण्यात येणारे विविध पर्यावरणीय उपक्रम जैवविविधतेचे जतन, संसाधनांचे संवर्धन आणि नवीकरणीय ऊर्जेच्या वापरासाठी योगदान देतात. यापैकी बरेच उपक्रम स्थानिक समुदाय आणि सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांसारख्या इतरांच्या सहकार्याने केले गेले आहेत.

बहाई उपासनागृहात, बागांसाठी पाण्याची उपलब्धता एक आव्हान होते आणि म्हणूनच, पहिली पायरी म्हणून, पावसाचे पाणी साठवून ठेवणाऱ्या सुविधा स्थापित केल्या गेल्या. यानंतर, महापालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया सुविधा बांधण्यात आली, नाहीतर जलमार्ग प्रदूषित होण्याची शक्यता वाढली असती. या उपक्रमांमुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले असून त्यामुळे हिरवीगार बाग निर्माण झाली आहे. गांडूळ खत प्रणाली देखील अस्तित्वात आहे. येथे, बागेतील कचऱ्याचा, (प्रामुख्याने गवताच्या कापण्या) ओळींमध्ये ढीग केला जातो आणि तो फायबर अंथरणीने झाकलेला असतो. या ओळींमधे कृमीं सोडल्या जातात आणि ओलसर ठेवल्या जातात. कालांतराने, कृमी बहुगणीत होतात आणि बागेतील कचर्‍याचे समृद्ध पोषक कंपोस्टमध्ये रूपांतर करतात जे नंतर खत म्हणून बागेत परत वापरले जाऊ शकते.

नंतरच्या काळात, वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात आले. या उपक्रमामुळे वीज खर्चात ४५ टक्के कपात झाली आहे.